अनिल भीसे मित्रमंडळ पुरस्कृत सलग चौथ्या वर्षी आयोजन
सावंतवाडी
कै. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाकडून दरवर्षी देण्यात येणारा ‘ आदर्श छायाचित्रकार पुरस्कार ‘ या वर्षी कुडाळकर फोटो स्टुडिओचे मालक मधुकर कुडाळकर याना देण्यात आला आहे. या पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष असून, विविध कार्यक्रम या मंडळामार्फत राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
छायाचित्रण स्पर्धेमध्ये लॉकडाऊन काळातील फोटों हा विषय दिला होता. यात २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात ३ क्रमांक काढण्यात आले. ते पुढीलप्रमाणे श्री. आदित्य अनिल वेल्हाळ (कोल्हापूर)-प्रथम क्रमांक, श्री. वैभव मिलिंद केळकर (देवगड)-द्वितीय क्रमांक तर श्री. संदेश विष्णू गावडे (सावंतवाडी) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला श्री. मधुकर कुडाळकर हे गेली ४० वर्षे कुडाळमध्ये छायाचित्रण करतात. त्यांचा कुडाळकर फोटो स्टुडिओ कुडाळमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये फोटोसाठी काम केले. तसेच जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यासाठी स्वतंत्र छायाचित्रकार म्हणून गेली २५ वर्षे काम केले. त्यांचे जुन्या काळातील विविध घटनाक्रमाचे फोटो आजही साक्षीदार म्हणून उपयोगी पडतात. श्री. मधुकर कुडाळकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानफ्रेम, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल भिसे मित्रमंडळाचे श्री. अनिल भिसे, श्री. गणेश हरमलकर, श्री. बेंजामिन फर्नांडीस, श्री. रत्नाकर माळी, श्री. नितीन कुडाळकर, श्री. बॅण्ड डिसोजा, श्री. अनंत मेस्त्री, श्री. प्रसाद कुडाळकर, श्री. सतीश हरमलकर, श्री. ललित हरमलकर, श्री. अनिकेत पारकर व कुडाळकर कुटुंबिय उपस्थित होते.