माड्याचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक…

माड्याचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक…

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील माङयाचीवाडी येथे मागील अनेक दिवस वायरमन तर्फे यांच्याबाबत तक्रारीत सतत वाढ होत आहे.  गावातील राईवाडी येथील दोन घरांचा विद्युत प्रवाह २५ मार्च रोजी विनाचौकशी तर्फे यांनी खंडित केला. यावर त्वरित वीज बिल भरणा केले असताना देखील गोरगरीब दोन घरांचा विद्युत प्रवाह सुरू केला नाही.

 

याविषयी ची माहिती संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सचिन गावडे यांना दिली. त्यानुसार माड्याचीवाडी ग्रामपंचायत येथे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ एकत्रित येऊन याविषयी जाब मागण्यासाठी थेट महावितरण अभियंत्यांना घेराव घेतला. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्या समवेत वायरमन तर्फे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज अभियंत्यांना दिला. तत्काळ वायरमन तर्फे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी माङयाचीवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

 

यावेळी सरपंच सचिन गावडे, उपसरपंच योगेश्वरी कोरगावकर, पोलीस पाटील चंद्रशेखर परब, विघ्नेश गावडे, सुदर्शन धांगडे, प्रशांत राणे, सुधाकर धुरी, प्रशांत राणे, आत्माराम गावडे, महेंद्र केरकर, गणपत राणे (माजी वायरमन), महेश गावडे, वामन गावडे, गुरू गावडे, भाई वारंग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा