युगानयुगे अन्याय सोसणे,
हा नाही आमचा पेशा.
सुर्यासारखे तळपत राहू या,
जय जय भारत देशा..
कुणी गांधी, कुणी सावरकर,
कोणी बदलुनी वेशभूषा.
शत्रूंवर तुटूनी पडले या,
जय जय भारत देशा.
ब्रिटिशांनी हुकूमत केली,
होती वेगळीच त्यांना नशा.
फुटले बॉम्ब सुटल्या गोळ्या या,
जय जय भारत देशा.
गोरे गेले देशबांधव आले तरी,
गरिबांची आजही होते दुर्दशा.
भ्रष्टाचारी जगतो मानाने या,
जय जय भारत देशा.
पैसा फेको तमाशा देखो ही,
राजकारणाची झाली परिभाषा.
सत्तेत येता विसरुनी जाती या,
जय जय भारत देशा.
चांगले दिवस कधीतरी येतील,
हिच सर्वांच्या मनात आशा.
गरीब श्रीमंत संपेल अंतर या,
जय जय भारत देशा.
जातीभेद नष्ट करा अस्पृश्यता,
घरोघरी मानवतेचा पोचवा संदेशा.
आठवूनी बलिदान वीरांचे नमू या,
जय जय भारत देशा..
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६