You are currently viewing कर्ली-घोणसरी येथे विवाहित तरुणाचा बुडून मृत्यू;दोघांना वाचवण्यात यश

कर्ली-घोणसरी येथे विवाहित तरुणाचा बुडून मृत्यू;दोघांना वाचवण्यात यश

वैभववाडी

कुर्ली – घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले मात्र दुर्दैवाने कोकिसरे येथील विवाहित तरुण गॅरेज मालकाचा घोणसरी येथील कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.मयत तरुण सुधीर गोविंद कदम वय 30 सध्या राहणार कोकिसरे, नारकरवाडी, मूळ रा.पाडळी खुर्द,ता.करवीर,जि.कोल्हापूर असे नाव आहे.ही घटना सोमवार 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेची फिर्यादी अमोल महादेव कदम वय 32 यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनला दिली. सोमवारी रंगपंचमी असल्याने कोकिसरे – वैभववाडी येथील 7 ते 8 जण तरुण मौज मजा करण्यासाठी कुर्ली -घोणसरी येथील धरण परिसरात गेले होते.तेथे जेवण मित्र मंडळी करत होते.तर काहीजण दुपारी कडक ऊन असल्याने पोहण्याचा मोह झाला.काही वेळ कालव्यात पोहणे सुरू होते.दरम्यान त्यातील पोहणारे दोन युवक पाण्यात बुडाले.आरडाओरड झाली तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी मयत सुधीर कदम या विवाहित तरुणाने पाण्यात उडीमारून दोघांना भोवऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले.मात्र स्वतः सुधीर धबधब्याच्या भोवऱ्यात अडकला काही मिनिटे ती भोवऱ्यात अडकला.त्यानंतर त्याला अन्य मित्रांनी बाहेर काढले.

त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले.दरम्यान त्याला वैभववाडी येथे उपचारासाठी आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सुधीर कदम याचे कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालय, नजीक फोर व्हीलर दुरूस्तीचे गॅरेज आहे. तो कोकिसरे येथे गेली 4 वर्षे चार चाकी वाहने दुरूस्ती करून कुटुं चालवीत होता. त्याचा एक वर्षा पूर्वी विवाह झालेला आहे.त्याच्या मृत्यूनंतर वैभववाडी शहरातील मित्रमंडळी हळहळ व्यक्त केली.त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

या घटनेचा पंचनामा वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मारुती सोनटक्के, श्रीकृष्ण पडवळ यांनी ग्रामीण रुग्णालय येथे या घटनेचा पंचनामा केला.यावेळी ग्रामीण रुग्णालय ,वैभववाडी येथे मनसे तालुका अध्यक्ष सचिन तावडे,दत्ता गुरव,रोहित रावराणे,विवेक रावराणे,व्यापारी बंडू सावंत,मेकॅनिक असिफ आरवाडे व वैभववाडी शहरातील शिक्षक, पोलीस,विविध क्षेत्रातील त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.रात्री उशिरा पाडळी, ता.करवीर येथील मूळ गावी अंत्य संस्कार करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा