You are currently viewing रंग…

रंग…

रंग पाण्याला नसताही,
महत्व आगळे वेगळे.
रंग भरल्या सरबतातही,
सहज जाऊन मिसळे.

होता खजील मनात,
चेहऱ्याचाही रंग उडतो.
हसरा चेहरा देखील,
निर्जिव होऊन पडतो.

गोऱ्या चेहऱ्याच्या आंतही,
रंग काळा असतो.
बोलल्यावरच माणसाच्या,
मनाचा रंग दिसतो.

रंग हळदीचा नवरीला,
नाजूक कोमल बनवतो.
भाळी लाल रंग कुंकवाचा,
सौंदर्य चेहऱ्याचे खुलवतो.

खेळता रंगांची होळी,
सप्तरंग शोभतात गाली.
लहान थोर युवाई सारी,
बेधुंद रंगात न्हाली.

(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा