You are currently viewing कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे निधन

कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे निधन

कणकवली

कणकवली कणकवली नगरपंचायतीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे सोमवार 29 मार्च रोजी निधन झाले. श्री पिंपळे हे सध्या डहाणू नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी त्यांनी दोन वेळा यशस्वी कार्यभार सांभाळला. कणकवली येथून त्यांची डहाणू येथे बदली झाली होती. दोन वर्षापूर्वी झालेल्या कणकवली नगरपंचायत महोत्सवात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत महोत्सव यशस्वी करण्यात त्यांचा हातभार राहिला होता. त्यांच्या छोट्या मुलीनेही महोत्सवातील किड्स फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता.
काही दिवसापूर्वी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 4 =