कर्नाटकातील हायस्पीड  ट्रॉलरवर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पकडला…

कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरवर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पकडला…

मध्यरात्री  मत्स्य विभागाची कारवाई

सिंधुदुर्ग

महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग सागरी हद्दीत निवती रॉकजवळील 18 वाव खोल समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील उडपी बंदरातील हायस्पीड ट्रॉलर पकडला आहे. मत्स्य विभागाच्या ‘शीतल’ गस्ती नौकेने शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

अतिरिक्त सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिपेश मायबा, सागर परब, स्वप्नील सावजी, चंद्रकांत कुबल हे सागरी सुरक्षा आणि पोलीस कर्मचारी संदिप सरकूंडे आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

कारवाई केलेला ट्रॉलर रविवारी पहाटे मालवण बंदरात आणण्यात आला असून ट्रॉलवर असलेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाने माहिती देताना सांगितले.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी करून मोठ्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर मोठ्या प्रमाणात मासळीची लूट करत आहे. या बोटींवर कारवाईची मागणी सातत्याने करण्यात येते. गेल्या काही दिवसात यापैकीच काही बोटींनी मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काल रात्री मत्स्य विभागाने केलेल्या धाडसी कारवाई बाबत समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा