वैभववाडी
मांगवली येथील सुवर्ण सिंधू गीर गोशाळा आणि पंचगव्य चिकित्सा केंद्राला ठाणे विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी भेट दिली. प्रवण शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष तथा गोशाळेचे संचालक महेश संसारे यांच्याकडून गोशाळेबाबत श्री. लहाळे यांनी माहिती जाणून घेतली. सुवर्ण सिंधू मार्फत देशी गाईच्या शेणापासून बनविण्यात आलेल्या पणत्या, गणेश मुर्त्या या उपक्रमाबाबत लहाळे यांनी आढावा घेत या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी श्री. एस. एन. म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. एस. एस. हजारे, तालुका कृषी अधिकारी श्री. एस. एस. कांबळे, मंडळ कृषी अधिकारी डी. एस. गिरी, कृषी अधिकारी श्री. ठमके, प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी संचालक सचिन म्हापुसकर, संचालक, श्री मंगेश कदम सुहास सावंत प्रवीण पेडणेकर उपस्थित होते.