You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीचा भत्ता शिक्षकांना प्राप्त होणार; जिल्हाधिकारी यांचे आदेश

ग्रामपंचायत निवडणुकीचा भत्ता शिक्षकांना प्राप्त होणार; जिल्हाधिकारी यांचे आदेश

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या मागणीला यश

१५ जानेवारी २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. सदर निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य पार पडलेल्या कर्मचारी यांना अद्यापही निवडणूक भत्ता प्राप्त झाला नसल्याने सदर निवडणूक भत्ता कर्मचाऱ्यांना प्राप्त व्हावा, अशी मागणी दिनांक १०/०३/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
त्यानुसार प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या निवेदनाची दखल घेवून जिल्हाधिकारी श्रीम के. मंजुलक्ष्मी यांनी ग्रामपंचायत निवडणूक भत्ता प्राधान्याने अदा करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहेत व याबाबतचे पत्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांना माहितीसाठी अग्रेषित केले असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांनी दिली आहे.
प्राथमिक शिक्षक शिक्षक भारतीच्या पाठपुराव्यामुळे निवडणूक भत्ता लवकरच प्राप्त होणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या निवेदनाची दखल घेवून तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल मान.जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजूलक्ष्मी यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा