तर गिरोबा स्पोर्ट्स काळेथर संघाला उपविजेतेपद…
मालवण :
देवबाग गाव आयोजित जिल्हा मर्यादित विभाग चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचा मानकरी व्हीबिआर सावंतवाडी संघ ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत अंतिम सामना रंगला. गोलंदाजांच्या मजबूत कामगिरीवर हा सामना सावंतवाडी संघाने जिंकला. गिरोबा काळेथर संघ उपविजेता ठरला.विजेत्या संघाला एक लाख एकवीस रुपये तर उपविजेत्या संघाला ७५,०२१ रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर म्हणून सावंतवाडीच्या सुजित सावळला सन्मानित करण्यात आले. १११ धावा व ६ गडी बाद करत संघासाठी अष्टपैलू कामगिरी त्याने नोंदविली. स्पर्धेत तृतीय क्रमांक महालक्ष्मी देवबाग संघ, तर चतुर्थ क्रमांक टीटीएमएम कुडाळ संघ ठरला. त्या संघांना प्रत्येकी २१,०२१ रुपये प्रत्येकी चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज दर्शन बांदेकर (महालक्ष्मी देवबाग), गोलंदाज सिद्धू परब (महालक्ष्मी देवबाग) यांना हिरो सायकल व चषक, क्षेत्ररक्षक म्हणून मीतेश बांदेकर (व्हीबीआर सावंतवाडी), यष्टीरक्षक सुधीर पालयेकर (गिरोबा काळेथर) अंतिम सामनावीर सिद्धेश माडये (सावंतवाडी) यांना रोख बक्षीस व चषक, प्रत्येक सामन्यातील सामनावीर आज टी शर्ट व चषक देऊन गौरविण्यात आले. मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर ही स्पर्धा गेले पाच दिवस खेळविण्यात आली. कोरोणा नियमावलीचे पालन करून होणाऱ्या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण आणि क्रीडा रसिकांना साठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. डांसर पंच म्हणून ओळखले जाणाऱ्या गोट्या पंच यांच्या अदाकारीचा क्रीडारसिकांनी आनंद लुटला. आज स्पर्धेला आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. देवबागातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण देवबाग स्पर्धा कमिटी अध्यक्ष स्वप्नील साळगावकर, रामचंद्र चोपडेकर, बाबू बिरमोळे, बाबली चोपडेकर, महेश चोपडेकर ,भरत पार्सेकर, उद्योजक मनोज उर्फ नाना सावंत, राजन कुमठेकर, माजी उपसरपंच उल्हास तांडेल, मनोज खोबरेकर, रमेश कद्रेकर, सहदेव साळगावकर, नादार तुळसकर, नागेश चोपडेकर, मोरेश्वर धुरी, रोशन धुरी, दर्शन बांदेकर, बबन पराडकर, निशाकांत पराडकर, रुपेश खोबरेकर, उदय घाटवळ, विशाल धुरी, गुंडू तांडेल, हेमंत चिंदरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दत्ता चोपडेकर, बाबा तोडणकर, गणेश मोटकर, नागेश चोपडेकर, महेश चोपडेकर, अमृतराव मकरंद चोपडेकर, प्रवीण सावंत, बाबा गावकर, मनोहर भास्कर, मोरेश्वर धुरी, उचित तांडेल, हरी बांदेकर आदी उपस्थित होते. पंच म्हणून उमेश मांजरेकर, मंगेश धुरी,आंब्रोज आल्मेडा यांनी काम पाहिले. गुण लेखन विल्सन फर्नांडिस, पायस आल्मेडा यांनी केले. समालोचन अमोल जमदाडे, प्रदीप देऊलकर, श्याम वाक्कर, नितीन आळवे यांनी केले.