वाढीव वीज बिलांविरोधात महावितरण कार्यालयावर भाजपची धडक

वाढीव वीज बिलांविरोधात महावितरण कार्यालयावर भाजपची धडक

सामान्य जनतेची आर्थिक लूटमार थांबवा, नाही तर संपुर्ण जिल्ह्यात आंदोलन करु

भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांचा इशारा

कुडाळ / पूनम राटूळ :-

सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आज कार्यकर्त्यांच्या उपथितीत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षयक अभियंता कार्यालयावर धडक देत वाढीव वीजबिलांबाबत आंदोलन करण्यात आले. वेगवेगळ्या घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध करत निवेदनाद्वारे भाजपच्या पदाधिकारी यांनी वीज बिल विरोधात समस्या मांडल्या व सामान्य जनतेची आर्थिक लूटमार नाही थांबवली तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये प्रत्येक तालुक्यात भाजपच्या वतीने महावितरण कार्यलयावर आंदोलने करण्यात येणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे संकट उभे राहिलेले असताना ही महावितरण कार्यालयातुन मोठ्या रक्कमेची वीज बीले ग्राहकांना पाठवली जात आहेत. या विरोधात भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने महावितरण कार्यालयावर आज धडक देण्यात आली. निवेदनाद्वारे भाजपच्या पदाधिकारी यांनी वीज बिल विरोधात समस्या मांडल्या व सामान्य जनतेची आर्थिक लूटमार नाही थांबवली व सहा महिन्याची वीज बिले संपूर्ण माफ करावीत अशी मागणी करण्यात आली जर असे नाही झाले तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये प्रत्येक तालुक्यात भाजपच्या वतीने महावितरण कार्यलयावर आंदोलने करण्यात येणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या बाबतच्या अनेक तक्रारी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याकडे मांडल्या यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी भाजप च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व निवेदनातील मागण्या वरिष्ठ पातळीवर कळवण्यात येतील अशी ग्वाही दिली. व याबाबत आपण आपल्या सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन ग्राहकांच्या तक्रारी दूर करू असे आश्वासन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिले.

यावेळी आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सोबत जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश धुरी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवडलकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,राजू राऊळ, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप,आनंद शिरवलकर,जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, राजेश पडते, अविनाश पराडकर, साक्षी सावंत नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेवक आबा धडाम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर,राजेश पडते, राकेश कांदे, दिनेश शिंदे, अजय आकेरकर, सतीश माडये, ममता धुरी, चेतन धुरी, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, अनंतराज पाटकर नगरसेविका सरोज जाधव, तेंडोली सरपंच भाऊ पोतकर, वालावल सरपंच निलेश साळसकर, संदेश मटकर, राजा प्रभू,,राजन पांचाळ, रेवती राणे ,आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा