You are currently viewing शहरातील चार गाड्यांची अद्याता कडून तोडफोड

शहरातील चार गाड्यांची अद्याता कडून तोडफोड

सावंतवाडी

शहरातील एका भागात उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीकडून फोडण्यात आल्या आहेत. सालईवाडा परिसरातील नागरिकांच्या गाड्यांसह कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या गाडीचा या मध्ये समावेश आहे. याबाबतची माहिती तेथील स्थानिकांकडून देण्यात आली आहे. हा प्रकार काल रात्री घडला असून, काल रात्री एका अद्यात दुचाकीस्वार युवकाने हा प्रकार केल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले आहे. पोलीसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. तर अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या अज्ञाताचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा