You are currently viewing सिंधुदुर्गात अखेर राणे फॅक्टरच

सिंधुदुर्गात अखेर राणे फॅक्टरच

जिल्हा परिषद भाजपाकडेच.. शिवसेनेच्या दाव्याची निघाली लक्तरे

जि.प. अध्यक्ष निवडणूकीत सौ. संजना सावंत यांचा एकतर्फी विजय

सिंधुदुर्ग 

जिल्ह्याचेच नाही तर अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकित माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गुलाल उधळला आहे. शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा दारुण पराभव करत भाजपच्या सौ. संजना सावंत यांनी विजय नोंदवला आहे. भाजपच्या वतीने रिंगणात उतरलेल्या सौ. संजना सावंत यांना 30 मते तर सेनेच्या कुडाळकर यांना अवघी 19 मते मिळाली.

भाजपचे जि.प. सदस्य उत्तम पांढरे आजारी असल्यामुळे निवडणुकीत गैरहजर राहिले त्यामुळे 50 पैकी एकूण 49 मतदान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा