You are currently viewing बांद्यात गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

बांद्यात गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा

गोव्यातून पुण्याकडे जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी आज सकाळी पोलिस तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अलीकडच्या काळातील बेकायदा दारू वाहतुकीविरोधातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार, विजय जाधव यांनी केली

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =