जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात..

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात..

 

पदाधिकाऱ्यांत उडाली शाब्दिक चकमक,; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप..

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा समिधा नाईक यांनी राजीनामा दिल्यावर, आज होत असलेली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. शिवसेनेने सौ वर्षा कुडाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा परिषद आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांना शाब्दिक चकमक उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. भाजपाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा