कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या विरोधानंतर घेतला निर्णय.
कणकवली / प्रतिनिधी :-
अखेर कणकवलीतील एसटी महामंडळाच्या जागेत घेतला जाणा रा आरटीओ कॅम्प रद्द करण्यात आला आहे. हा कॅम्प कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या भूमिकेमुळे रद्द करण्यात आला असल्याचे आरटीओ विभागाकडून जाहीर करण्यात आले. कणकवली तालुक्यात शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत एका ठिकाणी गर्दी झाल्यास हा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती आहे.
त्यामुळे कणकवली शहरात होत असलेल्या आरटीओ कॅम्प ला आमचा विरोध असेल अशी भूमिका समीर नलावडे यांनी स्पष्ट केली होती. यानंतर आज हा कॅम्प रद्द झाल्याचे आरटीओने जाहीर केले. कणकवली शहरात दिवसेंदिवस कोरोनाची साखळी वाढत आहे मात्र जर गर्दी वाढली तर ही साखळी आणखीनच वाढू शकते आणि त्यामुळे कोरोना चा संसर्ग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची भीती असल्यामुळे दक्षता म्हणून या कॅम्पला नगराध्यक्षांनी विरोध केला होता.