नागपूर
राज्यात वाघांची संख्या वाढल्याने वन्यजीव प्रेमींच्या चेहरे फुलले असताना गेल्या तीन महिन्यात अकरा वाघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला वाघीण आणि तिच्या गर्भातील तीन बछडय़ांच्या मृत्यूने झाली. त्यापाठोपाठ आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन बछड्यांचा, पेंचमध्ये अवनीच्या बछड्याच्या मृत्यूसह चार वाघांचा मृत्यू अधिवासाच्या झुंजीत झाल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच वाघांचा मृत्यू झाला होता.
२०१८ पासून तर आत्तापर्यंत भारतात ३०९ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यातील सर्वाधिक ८८ मृत्यू मध्यप्रदेशात, ६० मृत्यू महाराष्ट्रात तर ४१ मृत्यू कर्नाटक राज्यात झाले आहेत. उर्वरित मृत्यू हे इतर राज्यातील आहेत.