ग्रामपंचायत, निगुडे या ठिकाणी आज जलदिन साजरा करण्यात आला. निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जल शप्पथ घेण्यात आली. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे यांनी पाण्याचे महत्व अधोरेखित करून सर्वकाळ उपलब्धतेसाठी लक्ष केंद्रित करून सर्वव्यापी उपायोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे सन १९९३ पासून दर वर्षी दिनांक २२ मार्च हा जागतिक जलदिन साजरा करण्यात येत आहे. जलदिनाच्या निमित्ताने गावातील शुद्ध व सुरक्षित पाण्यासाठी जनसमुदायामध्ये जागृती निर्माण केली जाईल. ग्रामपंचायतीमार्फत पाणी वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागतिक जल दिनाचे महत्त्व सांगून आव्हान करणार आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच गावातील लोकांना पिण्यासाठी जास्तीत जास्त निधी जलजीवन मार्फत आणणार यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामसेवक तन्व्वी गवस, निगुडे तलाठी श्रीमती भाग्यश्रीला शिंदे, ग्रामस्थ पंढरीनाथ राणे, देवेंद्र केणी, बाप्पा जाधव, श्याम सुंदर सावंत, नारायण राणे, ग्राम रोजगार सेवक परेश गावडे, डाटा ऑपरेटर सुचिता मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते