You are currently viewing मिठीनदीसाठी विदेशी टेक्नॉलॉजी

मिठीनदीसाठी विदेशी टेक्नॉलॉजी

मुंबई

मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी या वर्षी महापालिका पहिल्यांदाच परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. नेदरलॅण्डची टक्शर एफ्मिबिअस मशीन नदीच्या खोल भागात जाऊन समान पातळीवर गाळ काढेल तर स्वीडनची सिल्ट पुशर मशीन गाळासोबत कानाकोपऱ्यात जाऊन तरंगता कचराही काढणार असल्यामुळ प्रभावी काम होणार आहे. त्यामुळं अतिवृष्टीत मिठीचं पाणी मुंबईत घुसून निर्माण होणारा पुराचा धोका टळणार आहे.

मुंबईत भांडुप फिल्टर पाडा-विहार तलाव परिसरात उगम पावणारी मिठी नदी मुंबईतील महत्त्वाची नदी आहे.

मात्र नदीच्या पात्रात गाळ राहिल्यास अतिवृष्टीच्या वेळी समुद्राला भरती असल्यास पाणी शहरात घुसून मुंबईकरांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार पूरमुक्तीसाठी पालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.

पूर्व उपनगरात १७.८० किमी वाहणारी मिठी नदी आरे कॉलनी, कुर्ला, वांद्रे परिसरातून वाहत जाऊन माहीम खाडीजवळ समुद्राला मिळते. या नदीचा सर्वाधिक भाग पूर्व उपनगरात येत असून, अतिवृष्टीत कोणताही धोका राहू नये यासाठी पावसाळ्याआधी नदीमधील गाळ काढून पाण्याचा मार्ग स्वच्छ प्रवाही करण्यासाठी अत्याधुनिक मशीन्सचा वापर करण्यात येणार आहे.

नेदरलॅण्ड, स्वीडनमध्ये नालेसफाई-गाळ काढण्यासाठी वापरल्या जाणार्या सिल्ट पुशर आणि टक्शर या बहुउपयोगी मशीन्सचा वापर केरळमध्येही यशस्वी ठरला आहे. त्यामुळं मिठीमधील गाळ काढण्यासाठी या मशीन्सचा वापर करणं कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आलं आहे. तरंगणं, खोल ठिकाणचा गाळ उचलून गोळा करणं अशी कामं प्रभावीपणे होणार आहेत.

महापालिका पावसाळ्याआधी १० एप्रिलच्या सुमारास मुंबईत नालेसफाई सुरू करते. मात्र मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी या वर्षी नालेसफाई महिनाभर आधीच मार्चमध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे ६ टक्के काम पूर्णही झाले आहे. या वर्षी मिठी नदीमधून दुप्पट गाळ काढण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले असून, या वर्षी दुप्पट रकमेची म्हणजेच ८० कोटींची टेंडर काढण्यात आल्याचं समजतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा