You are currently viewing जानवली पुलावर बुलेट व कारमध्ये अपघात; कारचे मोठे नुकसान

जानवली पुलावर बुलेट व कारमध्ये अपघात; कारचे मोठे नुकसान

कणकवली
मुंबई गोवा महामार्गावर जाणवली पुलावर बुलेट दुचाकी व कारमध्ये अपघात झाला.ही घटना 6.30 वा.सुमारास घडली.कारचालक चौपदरीकणावरून कोल्हापूरला जात होता.या दरम्यान बुलेट चालक अचानक हायवेच्या मधोमध येवून थांबल्याने मागून येणाऱ्या कारची धडक बसली.यात कारचे मोठे नुकसान झाले तर सुदैवाने दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात दाखल झाली नसून चर्चेतून प्रश्न मिटवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
अपघातस्थळी प्रसन्ना देसाई, मिलिंद केळुसकर,चंद्रशेखर पहुजा, परेश आचरेकर, सुरेश मालविया आदींनी मदत कार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा