वैभववाडी
ठाकरे सरकारचा निषेध असो. अशा विविध घोषणा देत वैभववाडी भाजपा पदाधिकार्यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रु वसुलीचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांना दिले असल्याचे पत्र माजी पोलीस आयुक्त परमवीर यांनी मुख्यमंत्री यांना देताच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या भ्रष्ट सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
वैभववाडी भाजपा कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, पं. स. उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य शारदा कांबळे, सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, संजय सावंत, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, महिला आघाडी प्रमुख भारती रावराणे, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, बाबा कोकाटे, शरद कांबळे, नारायण मांजरेकर, अशिष रावराणे, गोपाळ कोकाटे, सूर्यकांत कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.