सोनुर्ली माऊलीच्या चरणी वैभव नाईक नतमस्तक
देवस्थान समितीच्या वतीने माजी आमदारांचा सत्कार
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, देवस्थान समितीच्या वतीने वैभव नाईक यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार उपस्थित होते.
