You are currently viewing मनसेच्या वतीने मालवणात आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!!

मनसेच्या वतीने मालवणात आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!!

मालवण

मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका मनसेच्या वतीने दैवज्ञ भवनच्या सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ६७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन उपरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी,  महिला शहर अध्यक्ष भारती वाघ, मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, माजी तालुकाध्यक्ष रामनाथ पराडकर, अमित राजापुरकर, गुरू तोडणकर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, मनविसे शहरअध्यक्ष साईराज चव्हाण, मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे, तारकर्ली विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल, विजय पेडणेकर, पॉल फर्नांडिस, निखिल गावडे, प्रणव उपरकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.

अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने तपासणी होणार्‍या या आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी तपासणी, संपुर्ण शारीरिक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी, हृदय व मेंदुच्या रक्त वाहिन्यांची कार्यक्षमता, ECG रिपोर्ट, सफेदपेशी कोलॅजन मॅट्रीक्स, लिव्हर कार्यक्षमता ब्लड शुगर, हृदय व मेंदुच्या पल्स, पचन संस्थेची कार्यक्षमता, मिनरल्स,चॅनल्स व कोलॅटरल्स, पित्ताक्षय जीवनसत्व, रक्तातील चरबीचे प्रमाण, स्वादुपिंड, ॲमिनो ॲसिड, मोठ्या आतड्यांचे आरोग्य, मुत्रपिंड, को-एंझाईम्स, थायरॉइड कार्यक्षमता, फुफ्फुस, अंत:श्राव प्रणाली, पल्स ऑक्सिमीटर, रक्तवाहिन्या, रोग प्रतिकारक प्रणाली, बेसिक फिजिकल क्वॉलिटी, हाडांचे विकार, रक्तातील हेवी मेटल, ट्रेस मिनरल्स,हाड खनिज घनता,डोळ्यांचे आरोग्य,लहान हाडांचे विकार, ॲलर्जी, प्रोस्टेट, हाडांचे आरोग्य, त्वच्या व त्वचेसंबंधित घटक, स्त्रियांकरिता, ह्युमन टॉक्सिन, शरीर रचना विश्लेषण, गायनेकोलिजी, लठ्ठपपणा, मासिक पाळी, स्तनाचे विकार आदींची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर,शैलेश अंधारी, विल्सन गिरकर, संजय केळूसकर, भारती वाघ,राधिका गावडे, उदय गावडे,विशाल ओटवणेकर,प्रतीक कुबल, निखिल गावडे, गुरु तोडणकर, विजय पेडणेकर, साईराज चव्हाण, प्रसाद बापर्डेकर, बजरंग कुबल, मनमोहन केळुसकर, जनार्दन आजगावंकर आदी व इतरांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =