कचरावेचक महीला, घंटागाडी महिला व वृत्तपत्र विक्रेत्या महीलांची भाऊबीज.
नवी सांगवी,पिंपळ गुरव
या भागातील पालिकेच्या ठेकेदार पद्धतीने घंटागाडीवर गाडीवर कचरा संकलन करणाऱ्या गोरगरीब महिला व वृत्तपत्रे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना मानवी संरक्षण आणि जागृतीच्या वतीने प्रत्येक महीलेस दोन साड्या आणि 15 वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिवाळी फराळ देऊन त्यांची भाऊबीज गोड करण्यात आली,
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले कि
आपण आपली भाऊबीज आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात साजरी करत असतो परंतु आपल्या आरोग्यासाठी आणि कुटुंबासाठी हा वंचित घटक दिवाळीत सुद्धा काम करतांना बघतो आणि दिवाळीत कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता नागरिकांच्या आरोग्यासाठी सेवा देत असतात याच भावनेतून “मदत न म्हणता कर्तव्य समजून “आम्ही आमचा दिवाळी सण साजरा न करता त्यांना काय देता येईल या उदात्त्य भावनेतून आम्ही असा वंचित घटकासाठी समाजमुख उपक्रम दरवर्षी राबवत असतो पुढे जोगदंड म्हणाले कि या आमच्या सामाजिक उपक्रमाची दानशूर व्यक्ती व वर्तमानपत्रे ही दखल घेतात त्यामुळेच आमच्या कार्यकर्तेचे मनोधैर्य वाढते, या प्रेरणेमुळे अधिक जोमाने आम्ही काम करतो.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,महिला शहराध्यक्षा संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष काळुराम लांडगे,राजगुरुनगरचे अध्यक्ष शंकर नाणेकर,सामाजिक कार्यकर्ते,सतीश हंचाटे,निलेश हंचाटे,अरविंद मांगले,आलका लोंढे,जयश्री मोरे,जयश्री मस्के, राणूबाई बिराजदार,आशा जाधव, इत्यादी उपस्थित होते.
