You are currently viewing NABच्या दृष्टिबाधित लाभार्थ्यांना उद्या दीपावली भेटीचे वाटप

NABच्या दृष्टिबाधित लाभार्थ्यांना उद्या दीपावली भेटीचे वाटप

NABच्या दृष्टिबाधित लाभार्थ्यांना उद्या दीपावली भेटीचे वाटप

विशाल परब यांच्या सहकार्यातून NAB सिंधुदुर्गचा उपक्रम; मार्गदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन

सावंतवाडी

NAB सिंधुदुर्गच्या दृष्टिबाधित लाभार्थ्यांसाठी उद्या शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दीपावली भेट वितरण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता NAB नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथील पहिल्या मजल्यावर हा कार्यक्रम होणार आहे.
मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या सहकार्यातून दृष्टिबाधित लाभार्थ्यांना यंदा दीपावली भेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष रो. प्रवीण परब, इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे, सचिव सौ. दर्शना रासम तसेच रोटरी क्लब सावंतवाडीचे सचिव रो. सुहास सातोस्कर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, दीपावली भेटीचे वितरणही करण्यात येणार आहे. तरी NAB सिंधुदुर्गच्या सर्व दृष्टिबाधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन NABचे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर व खजिनदार श्रीमती विनया बाढ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा