You are currently viewing पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ योजना ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा;

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ योजना ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा;

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ योजना ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा;

आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग

शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ हजार ४०५ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ३ हजार ३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात आतापर्यंत १८ कोटी ५१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रदीप मालगावे यांनी केले आहे.

            या योजनेअंतर्गत १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

            महाआयटीमार्फत विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडील राज्यातील २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ हजार ४०५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

            जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ३ हजार ८७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, १ हजार ५३४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी आज ६३९ लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात ४ कोटी १० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर एकूण ३ हजार ३९७ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८ कोटी ५१ लाख रुपये वितरित झाले आहेत.

            राज्यस्तरावर आज ४ लाख ८७ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तर आजअखेर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २० लाख ७२ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात एकूण १८ हजार ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

            सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, प्रदीप मालगावे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा