You are currently viewing भेडल्यामाडाला संरक्षण मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविणार – शहाजी नारनवर

भेडल्यामाडाला संरक्षण मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविणार – शहाजी नारनवर

सावंतवाडी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन…

सावंतवाडी

भेडल्या माडाची होणारी अवैद्य तोड थांबवण्यासाठी त्याचा संरक्षित झाडात समावेश व्हावा, म्हणून १५ एप्रिल नंतर शासन स्तरावर प्रस्ताव पाठविला जाईल, असे आश्वासन वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात होत असलेली भेडल्या माडाची तोड थांबविण्यात यावी, तसेच संबंधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. दरम्यान यासंदर्भात कोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या, याबाबत चर्चा करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.नारनवर यांची आज भेट घेतली.
यावेळी मनसेचे परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, अँड.अनिल केसरकर आदी उपस्थित होते.
भेडल्या माडाची तोड थांबविण्यात यावी, अशी मागणी गेले काही दिवस मनसेकडून होत आहे. दरम्यान या संदर्भात कोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या, असा सवाल मनसेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्री.नारनवर यांना केला.
यावेळी श्री.नारनवर म्हणाले, भेडल्या माडाचा संरक्षित झाडात समावेश असल्यामुळे संबंधितावर कायदेशीर कारवाई करता येत नाही, त्यामुळे त्याला संरक्षण मिळण्यासाठी आपण वनविभागामार्फत शासन स्तरावर तसा प्रस्ताव पाठवू, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेडल्या माडाची झाडे आहेत. तर ते वन्य प्राण्यांचे खाद्य सुद्धा आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका पोहोचू नये यासाठी ही तोड थांबविणे गरजेचे आहे. यासाठी आपण घेतलेला पुढाकार योग्यच आहे. त्याचे मी ही समर्थन करतो, मात्र भेडल्या माडाची तोड करणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात कोणत्याही कायदेशीर तरतुदी नाहीत. त्यासाठी भेडल्या माडाचा संरक्षित झाडात समावेश होणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा