सिंधुदुर्गनगरी
शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 दिनांक 14 मार्च 2020 रोजी पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतूदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील आदोशानुसार त्या त्या जिल्हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत. राज्यात कोव्हीड १९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोव्हिड १९ विषाणूचा फैलाव रोखणेसाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करणेबाबत निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्वस्थापन प्राधिकरण के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात कोविड १९ चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरीता पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
सर्व सिनेमागृह (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सेस), हॉटेल्स, रेस्टॉरंट्स खालील प्रतिबंधास अधिन राहून 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. योग्य रितीने मास्कचा वापर न करणाऱ्यास प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाव्दारावरच तापमापीचा उपयोग करुन शरिराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी, जेणेकरुन ताप (Temperature) असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश मिळणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात Hand Sanitizers उपलब्ध ठेवावे. सर्व आस्थापनांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरुन सर्व अभ्यांगताबाबत मास्कचा योग्य वापर तसेच सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.
सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधित सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टीप्लेक्सेस), हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ही, कोव्हीड 19 विषाणू संसर्ग केंद्र सरकाने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे पर्यंत, बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
सर्व शॉपिंग मॉल यांना पुढील निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक असेल. योग्य रितीने मास्कचा वापर न करणाऱ्यास प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाव्दारावरच तापमापीचा उपयोग करुन शरिराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी, जेणेकरुन ताप (Temperature) असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश मिळणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात Hand Sanitizers उपलब्ध ठेवावे. सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरुन सर्व अभ्यांगताबाबत मास्कचा योग्य वापर तसेच सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. सर्व मॉल व्यवस्थापक यांनी संबंधित मॉलमध्ये असलेले थियटर्स, रेस्टॉरंट किंवा इतर कार्यरत आस्थापना यामध्येही घालण्यात आलेल्या प्रतिबंधाचे सदर आस्थापना सुरु करणेपुर्वी तसेच सुरु असताना पालन करत आहेत याबाबत दक्षता घेणे.
सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित शॉपिंग मॉल्स ही, कोव्हीड 19 विषाणू संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेपर्यंत, बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका, संमेलने इ. चे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृह, इतर ठिकाणे ही, कोव्हीड 19 विषाणू संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेपर्यंत, बंद केली जातील.
विवाह समारंभ कार्यक्रम फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसिलदार यांचेकडील पूर्व परवानगी आवश्यक असेल. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे ठिकाण, हॉल मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित ठिकाणे, हॉल ही, कोव्हीड 19 विषाणू संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेपर्यंत, बंद केली जातील.
अंत्यविधी, अंत्ययात्रा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास फक्त 20 नातेवाईक, नागरिकांना सामाजिक अंतराचे निकष पाळून उपस्थित राहण्यास परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण यांनी या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री करावी.
गृह अलगीकरणास पुढील प्रतिबंधास अधिन राहू परवानगी असेल. गृह अलगीकरण झालेल्या नागरिक, रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यवसायिकाच्या (डॉक्टर) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल. कोव्हीड 19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून14 दिवसापर्यंत दर्शनी ठिकाणी फलक लावावा, जेणेकरुन त्या ठिकाणी कोव्हीड 19 रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल. कोव्हीड 19 पॉजिटीव्ह रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine) असा शिक्का मारणे. सदर कोव्हीड 19 रुग्ण गृह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केल्याशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, याविषयी दक्षता घ्यावी. गृह अलगीकरणाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड 19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटर (CCC) मध्ये स्थलांतरीत केले जाईल.
सर्व कार्यालये, आस्थापना (आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही 50 % क्षमतेच्या अधिन राहून सुरु राहतील. घरातून काम (Work From home) करणेबाबत प्रोत्साहित करणे. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यालय, आस्थापना व्यवस्थापन ही, कोव्हीड 19 विषाणू संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेपर्यंत, बंद राहतील. सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल या दृष्टीकोनातून तासाला किती अभ्यांगतांना प्रवेश देण्यात येईल या संख्येची निश्चिती करुन प्रसिध्दी करणे. भाविक तसेच अभ्यांगतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतींचा वापर करणे.
वरील ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरुन प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे. योग्य रितीने मास्कचा वापर न करणाऱ्यास प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाव्दारावरच तापमापीचा उपयोग करुन शरिराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी, जेणेकरुन ताप (Temperature) असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश मिळणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात Hand Sanitizers उपलब्ध ठेवावे. सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरुन सर्व अभ्यांगताबाबत मास्कचा योग्य वापर तसेच सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.
यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी, क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत अस्तित्वात राहतील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.