*सूरमयी साहित्य समूहाचे सन्मा.सदस्य कवी जोतिबा पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*द्रष्टा राजा…!*
रयतेच्या सुखासाठी
झिजले आयुष्य सारे,
समतेचे दीप उजळून
दूर केले अंधार सारे…!
शिक्षणाची गंगा वाहिली
वंचितांना दिला नवा श्वास,
मानवतेच्या पवित्र वाटेवर
घडविला परिवर्तनाचा ध्यास…!
जात-पात, मतभेद सारे
कर्तृत्वापुढे क्षुद्र ठरले,
न्याय, समता, बंधुभावाचे
भक्कम स्तंभ तेच बनले…!
रयतेच्या डोळ्यांतील स्वप्नांना
दिल्या आशेच्या नव्या दिशा,
राजर्षी शाहूंच्या कार्यातून
उजळली महाराष्ट्राची दशा…!
आजही त्यांच्या विचारांचा
समाजाला लाभे प्रकाश,
समतेच्या त्या द्रष्ट्या राजाला
शतशः मानाचा प्रणाम खास…!
जोतिबा पाटील, किटवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
