You are currently viewing सावंतवाडीत योगप्रसारासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांचा पुढाकार
Oplus_16908288

सावंतवाडीत योगप्रसारासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांचा पुढाकार

फिट इंडिया मंत्रातून प्रेरणा; विविध भागांत योगा सेंटर सुरू करणार, योगशिक्षकांचा गौरव

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच विविध भागांत योग केंद्रे सुरू करून नागरिकांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये फिटनेस योग फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या योगशिक्षकांना विशाल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळते. त्यामुळे योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. ग्रामीण तसेच शहरी भागांत योगाविषयी जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना योगाभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असेही विशाल परब यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला योग प्रशिक्षक शेखर बांदेकर, संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, निशिगंधा सावंत, रेवती सावंत तसेच योग प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा