You are currently viewing .ग.खटखटे ग्रंथालयात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

.ग.खटखटे ग्रंथालयात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

र.ग.खटखटे ग्रंथालयात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

वेंगुर्ले

र.ग.खटखटे ग्रंथालयामध्ये शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रंथालयाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रास्ताविक:
कार्यक्रमाची सुरुवात श्री. शेखर पणशीकर यांनी गायलेल्या गणपतीच्या भक्तीगीताने झाली. त्यांच्या सुमधुर गायनाने संपूर्ण वातावरणात मांगल्य पसरले. यानंतर ग्रंथालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष डॉ.श्रीराम दीक्षित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.राजन शिरोडकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले .सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले डॉ.श्रीराम दीक्षित सर यांनी कार्यक्रमाचे मनोगत व प्रास्ताविकपर भाषण केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार:
यानंतर विविध कलाकारांनी आपल्या कलागुणांनी कार्यक्रमात रंग भरले. श्री. भालचंद्र दीक्षित यांनी सुंदर कविता सादर केल्या, तसेच त्यांनी दाखवलेल्या जादूच्या प्रयोगांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. श्री. रवींद्र पणशीकर यांनी संगीत ययाती देवयानी यांच आपल्या पहाडी आवाजात नाट्यगीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर सविता सातपुते मॅडम यांनी एक छान आणि रंजक गोष्ट सादर केली.

कोजागिरीची माहिती:
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व सांगत अनेक सदस्यांनी साहित्याची मेजवानी दिली. यामध्ये प्रियदर्शिनी म्हाडगुत, चंद्रकांत नारिंगणेकर, राजेश वैज, प्रकाश परब, भाग्यश्री मुद्रास, कमलेश आणावकर, श्रद्धा राऊळ, प्राची पालयेकर, ऊर्जित परब आणि श्री. विनय सौदागर सर यांनी कोजागिरीची माहिती दिली, तसेच सुंदर मालवणी कविता सादर करून कार्यक्रमात एक वेगळीच स्थानिक लज्जत आणली.

सुमधुर गाण्यांची मैफल:
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ.श्रीराम दीक्षित, वैभवी रायशिरोडकर, राजेश वैज आणि अनिल निखर्गे यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत उपस्थितांना डोलायला लावले.

आभार प्रदर्शन:
कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे सर यांनी सर्व कलाकार, ग्रंथालयाचे सदस्य आणि उपस्थित रसिकांचे मनापासून आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला तबला वादक श्री.प्रसाद जोशी आणि पेटी वादक म्हणून श्री.रविंद्र पणशीकर यांची साथ लाभली.सर्वांच्या सहभागामुळे हा कोजागिरीचा सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील अशा पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथालयाचे ग्रंथपाल सौ. प्राची पालयेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा