You are currently viewing बिबवणे-बांबर्डे हद्दीवर डंपरला आग; चालक सुखरूप

बिबवणे-बांबर्डे हद्दीवर डंपरला आग; चालक सुखरूप

बिबवणे-बांबर्डे हद्दीवर डंपरला आग; चालक सुखरूप बचावला

जॉईंट तुटून डिझेल टाकीवर आदळला; रस्त्यावर घर्षण होऊन ठिणग्या उडाल्याने डंपरने घेतला पेट

सिंधुदुर्ग :

बिबवणे-बांबर्डे गावांच्या हद्दीवर डंपरला आग लागल्याची घटना घडली. डंपरचा जॉईंट तुटून डिझेल टाकीवर आदळला. त्यानंतर जॉईंट रस्त्यावर घासल्याने ठिणग्या उडाल्या आणि डंपरने पेट घेतला.
सदर डंपर मडुरा येथील असून, त्याचे मालक संतोष जाधव असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत डंपरचा चालक सुखरूप बचावला असून, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
डंपरला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत वाहनाचे किती नुकसान झाले, याबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा