🌷 अठरावा स्मृतिदिन 🌷
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
स्व. बाबासाहेब नाडकर्णी
अठरा वर्षे सरली, तरी आठवणी आजही ताज्या…
देहाने दूर, स्मृतींतून सदैव जवळ!
तुमचे सदैव स्मरणार्थी
• अजित शुभदा राधाकृष्ण नाडकर्णी
• शुभांजीत सृष्टी, माधव बुक सेंटर, शितल एजन्सी,
• अखिलेश मोटर्स, शितल नर्सरी
नाडकर्णी परिवार, फोंडाघाट
आज बाबांना आपल्यातून जाऊन १७ वर्षे झाली. काळ पुढे सरकत असला, तरी त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे संस्कार आणि त्यांनी घालून दिलेला आदर्श आजही आमच्या जीवनाचा आधार आहे.
बाबांनी सुरू केलेले ‘माधव बुक सेंटर’ आजही ५० वर्षांची परंपरा जपत अविरत सुरू आहे. त्यानंतर मी स्वतः ‘शितल एजन्सी’ ही फर्म सुरू केली. व्यवसायाचा विस्तार होत गेला आणि वाढत्या व्यापामुळे दुसऱ्या ठिकाणी आणखी एका दुकानाची सुरुवात केली. या संपूर्ण प्रवासात बाबांनी दिलेले संस्कार, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची वृत्ती आणि माणसे जोडण्याची कला यांचीच मला सदैव साथ लाभली.
बाबांचा दरारा, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि समाजाप्रती असलेली तळमळ हे गुण नेहमीच प्रेरणा देत राहिले. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा त्यांनी दिलेला वसा जपण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. ग्रामपंचायत, शाळा, माजी संचालक म्हणून बँकेतील जबाबदारी आणि कणकवली कॉलेजचे सदस्य अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला.
आज मागे वळून पाहताना एकच भावना मनात येते… बाबा आज आपल्यात असते, तर आमचा हा प्रवास, आमची प्रगती आणि आम्ही जपलेले त्यांचे संस्कार पाहून त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता!
बाबा, तुम्ही आज आमच्यात प्रत्यक्ष नसला, तरी तुमचे विचार, तुमची शिकवण आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. तुम्ही दिलेला वारसा आणि समाजसेवेचा वसा असाच पुढे चालू ठेवणे, हीच तुम्हाला खरी आदरांजली!
🌹 आपल्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आणि अठराव्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹
🙏💐🪷
– अजित, शुभांगी, अखिलेश, शितल, रोहन व अर्णव

