You are currently viewing अशी लावणी तशी लावणी…
Oplus_16908288

अशी लावणी तशी लावणी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अशी लावणी तशी लावणी…*

 

अशी लावणी तशी लावणी

कळतंच नाही सांगा ना

हवेमध्ये एक महाल सुंदर

माझ्यासाठी बांधा ना…

 

लावणीत सुंदर कल्पना

प्रेमविलास नि नवलाई

प्रेम फक्त हो शारीर नसते

मनोमिलनाची आमराई…

 

आमराईत हो झुळझुळ वारे

मोहोर येतो चवदार

राघू बोलती मैना बोलती

किलबिलती गारेगार..

 

लावण्यच ते आजूबाजूला

नजर पारखी हवी पण

नारीच फक्त सुंदर नसते

सुंदर आपण सारे जणं…

 

निसर्गाची खूण पटविते

सौंदर्याची नवलाई

मूलही असते किती ते सुंदर

त्याहून सुंदर हो आई..

 

सौंदर्य असावे नजरेतच हो

दृष्टी असावी साफ बघा

नारी नारी भवती लावणी

उगाच रिंगण घालू नगा..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा