You are currently viewing वसंत लक्ष्मण पुंड यांना पीएच्. डी. पदवी प्रदान

वसंत लक्ष्मण पुंड यांना पीएच्. डी. पदवी प्रदान

अहिल्या नगर / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून श्री. वसंत लक्ष्मण पुंड यांना मराठी विषयातील “दिनेश काळे यांच्या साहित्यातील महानगरीय जीवन जाणिवा ” या संशोधन विषयासाठी पीएच्.डी. पदवी बुधवार दि. १४ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदान करण्यात आली. श्री. वसंत पुंड यांनी हे संशोधनकार्य गांधी महाविद्यालय, कडा येथील मराठी विभाग प्रमुख, प्रो. डॉ. अनिल गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले त्यांनी दिनेश काळे यांच्या कथा, कादंबरी व नाटक या साहित्यातील महानगरीय जाणिवांचा अभ्यास केला. मुंबई महानगरातील सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय नोकरदार यांच्या संवेदना, मूल्यऱ्हास, असुरक्षितता, उपरेपणा, संघर्ष, मेटाकुटीला आलेले जीवन, अहोरात्र कष्ट करूनही पोट भरत नाही हे वास्तव मांडले. त्यांचे हे संशोधन कार्य नवोदित अभ्यासकांना दिशादर्शक ठरेल.

 

पीएच्. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री. वसंत पुंड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख वरिष्ठ प्रा. डॉ. रमेश जाधव, प्रो. डॉ. आनंद वाघ, आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे संचालक प्राचार्य डॉ. विधाते एच.जी., मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो. डॉ. गोपीनाथजी बोडखे, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्यचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ, प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे, श्री योगेश जपे, श्री दत्ता कोकाटे, श्री सिद्धार्थ जाधव मित्र परिवार व इतर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. वसंत पुंड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा