You are currently viewing विजयनगर चौक परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई; अनधिकृत हातगाड्या हटविल्या

विजयनगर चौक परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई; अनधिकृत हातगाड्या हटविल्या

विजयनगर चौक परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई; अनधिकृत हातगाड्या हटविल्या

सांगली: प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत विजयनगर चौक ते रेल्वे ब्रिज तसेच विजयनगर ते पर्ल हॉटेल परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये आणि परिसरातील रस्ते अतिक्रमणमुक्त राहावेत, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सहाय्यक आयुक्त श्वेता सुर्वे ,अतिक्रमण अधीक्षक सचिन सागावकर, अतिक्रमण अधीक्षक नागार्जुन मद्रासी यांच्यासह अतिक्रमण विभागाची पथके व नगररचना विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे विनापरवाना हातगाड्या तात्काळ हटविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या
विजयनगर परिसरातील परवाना असलेल्या २१ हातगाड्यांचे सतराळकर कॉम्प्लेक्सच्या पलीकडे असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागेतील मंजूर हॉकर झोनमध्ये स्थलांतर करण्यात आले. तसेच सतराळकर कॉम्प्लेक्सच्या बाहेरील बाजूस अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या चार हातगाड्या हटविण्यात आल्या.

विजयनगर सेंटर मॉलसमोरील १६ परवानाधारक हातगाड्या आणि ३ विनापरवाना हातगाड्या महापालिकेच्या विजयनगर येथील खुल्या जागेत हलविण्यात आल्या. याशिवाय एक सुरक्षा रक्षक केबिन आणि एक फायबर खोका हटविण्यात आला, तर तीन टी-स्टँड बोर्ड काढून टाकण्यात आले.
मंजूर हॉकर झोनमध्ये केवळ परवानाधारक फेरीवाल्यांनाच जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जागेवर विनापरवाना हातगाडी लावल्यास संबंधित हातगाडी हटवून जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच यापुढे विजयनगर चौकात कोणत्याही फेरीवाल्याने हातगाडी लावू नये. हातगाडी लावल्याचे आढळल्यास संबंधित हातगाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

*संवाद मीडिया*

रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे

रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी मध्ये नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).

👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).
संधी –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.

पत्ता:
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

📞 संपर्क:

9960906947 / 9422620047

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

जाहिरात लिंक👇
https://sanwadmedia.com/204123/
——————————————————–
*संवाद मीडिया*
*वेबसाईट : https://sanwadmedia.com/*
*फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia*
*चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia*
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा