जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल चे सुयश
वेंगुर्ले
राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी हर्षांक रमेश टेमकर याने 14 वर्षांखालील मुले या गटातून 100 मीटर फ्री स्टाईल या प्रकारात ब्राँझ मेडल प्राप्त केले तर 17 वर्षांखालील मुले या गटातून इयत्ता नववीतील विद्यार्थी श्रेयश कृष्णा साटेलकर या विद्यार्थ्याने 50 व 100 मीटर फ्री स्टाईल या प्रकारात ब्राँझ मेडल प्राप्त केले.
दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परुळेकर, संचालक प्रशांत नेरुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
