You are currently viewing वेंगुर्ल्यात १३ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

वेंगुर्ल्यात १३ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन, शरद चव्हाण प्रमुख पाहुणे

वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान-२०२६’ अंतर्गत तसेच भाजप युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे हे शिबिर होणार आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. प्रमोद जठार यांच्या हस्ते होणार असून, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. शरद चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला व पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच या सेवाभावी उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा