You are currently viewing सावंतवाडी भटवाडी येथे मोफत “जनआरोग्य” शिबिर संपन्न

सावंतवाडी भटवाडी येथे मोफत “जनआरोग्य” शिबिर संपन्न

सावंतवाडी भटवाडी येथे मोफत “जनआरोग्य” शिबिर संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी भटवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर सहा मध्ये घेण्यात आलेल्या मोफत “जन आरोग्य” शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला यात एकूण 83 लोकांनी आपली तपासणी करून घेतली
हे मोफत आरोग्य शिबिर महिला बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते
त्यात विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या व मोफत औषधोपचार देण्यात आले
या तपासणी करण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील डॉ. सागावकर व त्यांची संपूर्ण टीम यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले
या तपासणी करत असताना नागरिकांसोबत शंभर वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक वेध पाठशाळेत शिक्षण घेत असलेले संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली ही तपासणी करत असताना वेधशाळेचे गुरुवर्य भूषण केळकर गुरुजी यांनी मनस्वी ऋण व्यक्त केले
त्याचबरोबर वि स खांडेकर विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांची ही तपासणी करण्यात आली त्यात सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनीही आपल्या वेगवेगळ्या टेस्ट करून घेतल्या
भटवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर सहा मध्ये ही आरोग्य तपासणी घेत असताना तेथील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आपल्या प्रभागातील आवश्यक लोकांसाठी ही तपासणी ठेवली होती जेणेकरून आपल्या प्रभागातील सर्वांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे यासाठी हा छोटासा प्रयत्न होता
यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर डॉ.सागावकर व त्यांची संपूर्ण टीम ,शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर जि. प.शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव सर, शिक्षिका सायली लांबर, पूजा गुरव मॅडम वि. स. खांडेकर चे मुख्याध्यापक सतीश धुमाळे सर सौ पाटील मॅडम तसेच वेदपाठशाळेचे गुरुवर्य भूषण केळकर गुरुजी,प्रसाद कशाळीकर समिधा नाईक,
सौ. शेख शितल बर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा