*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवरात्रीचे नऊ रंग*
आदिमाया जगदंबा
तिचे दिव्य स्वरूप
नऊ रंगात रंगलेले
भव्य तेजस्वी रूप…
शांत संयमी असते
कधी रणरागिणी
शस्त्र हाती घेऊन
संहारिते राक्षसगणी….
बुध्दी वाणी ज्ञान
देते शारदा सकलांना
उपकृत साहित्यिक
घडवते शब्द कृतीला…
अनाचार माजलेला
तिथे अवतरते काली
उग्र, रौद्र रूप तिचे
थरथरते भोवताली…
लक्ष्मी समृध्दी संपन्नता
संसारास सजवते
नऊ रंगात विशेष
स्वत:चं अस्तित्व दर्शवते….!!
अरुणा दुद्दलवार🙏🏻✍️
