You are currently viewing गुपित सांगूनी गेला नाना

गुपित सांगूनी गेला नाना

*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”गुपित सांगूनी गेला नाना”*

 

जीवनामध्ये मृत्यूचे,

गुपित सांगूनी गेला नाना

“शाश्वत” मृत्यू स्विकारतांना

जगणे किती छान पहाना /१/

 

सतत मृत्यूची साथ बरोबर

समय “मुकर्रर”केला त्याने

“कर्म” ऐसे करुनी जा हो

जगी वाहवा, होईल ज्याने /२/

 

“बळीराजा” चे अश्रू जेव्हा

फास दोरीचा भिजवीती

पोरे, पत्नी मागे सोडून

“शाश्वत” मृत्यूला कवटाळिती /३/

 

आर्त शोक अन् चिंतीत चेहरे

पाहून द्रवला, कठोर नाना

अश्रू त्यांचे पुसण्यासाठी

केली “नाम”संघटना. /४/

 

“स्पष्टवक्ता” म्हणूनी ख्याती

अभिनय क्षेत्रीचा “नटसम्राट”

नेत्री आज देऊन अश्रू

अज्ञात जगाची,धरली वाट /५/

 

सभा प्रसंग असो कोणता

सतत मृत्यूचे करी विधान

बळीराजाच्या जगण्यासाठी

कधी न स्विकारी मानसन्मान/६/

 

“कलागुणांचे सर्व दागिने”

सोबत घेऊनी गेला नाना

बारा मणांची काष्ठ चितेची

राख ठेऊनी गेला नाना /७/

 

नाना, तुला साश्रू नयनांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

रचना:– मोहन मराठे

प्रतिक्रिया व्यक्त करा