*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित लेख*
*चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार — नाना पाटेकर*
साधारण 2021 मधील घटना आहे, माझी विद्यार्थिनी– माझी लेक– वसूंधरा काशीकर व नानांची चांगली ओळख म्हणून, तिला एकदा म्हटलं होतं नानांचा फोन देते का? त्यावर ती म्हणाली खूप फटकळ आहेत ते! तो विषय तसाच राहिला, आणि आता नानांचा मो.,न. नसला तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेल्या भावना व्यक्त करतांना काळजाला होणाऱ्या जखमाचे काय करायचे?
नाना, तुम्ही नेहमी म्हणायचे की ,आपल्या सतत बरोबर ना आपले आईवडील भाऊ बहीण असतात ना मित्र, ना सखे सोयरे! सतत सावलीसारखा साथ देणारा एकच तो — म्हणजे आपला मृत्यू! तो सतत आपली सोबत करतो म्हणून त्याचीच आठवण ठेवली पाहिजे
,जीवनाचे हे त्रिकाल बाधित सत्य समजावून सांगण्यासाठी मोठमोठे ग्रंथ लिहिले गेले , परंतु नाना, तुम्ही सहज एका सोप्या वाक्यात सांगितले कमाल वाटते तुमच्या विचारशक्तीची!
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तुम्ही समस्त रसिक जनांचे हृदय सम्राट
बनलात! मराठी रंगभूमिपासून सुरवात करून स्वतःच्या अभिनयाने हिंदी मराठी चित्रपट सृष्टीला काबीज केले. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा इथे जन्म झालेला, लहानपणापासून संघर्षाशी दाट मैत्री तुमची! आर्थिक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती, आणि आयुष्याने दिलेले कठीण धडे यातून तुमचा स्वभाव घडत गेला, म्हणूनच तुमच्या अभिनयात कधी कृत्रिमता जाणवली नाही, तुम्ही केलेल्या सगळ्या भूमिका तुम्ही प्रत्यक्ष जगत होतात इतका खरेपणा होता तुमच्या अभिनयात!रंगभूमिपासून सुरू झालेला तुमचा प्रवास चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला, गमन पासून सुरवात करून परिंदा , क्रांतिवीर अग्निसाक्षी, खामोशी, अब तक छप्पन ,राजनीती, अपहरण अशा अनेक चित्रपटामुळे तुमची स्वतंत्र ओळख निर्माण झाली, क्रातीवीर मधील तुमचा अभिनय कोण विसरू शकेल? त्यातील भूमिकेसाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पुढे नटसम्राट मधील गणपतराव बेलवरकर हा तुमच्या कारगिर्दीचा एक अविस्मरणीय अध्याय म्हणून रसिक मानतात, त्यावेळी तुम्ही फक्त प्रत्यक्ष गणपतराव असेच वाटत होते, एक वृद्ध रंगकर्मी आयुष्यभर टाळ्यांच्या गजरात आणि शेवटी अगदी एकटा! तुमच्या आवाजातली ताकद तुमची देहबोली आणिचेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव तुमच्या
अभिनय कौशल्याची साक्ष पटवून देणारे! तुम्ही केवळ अभिनेते नव्हता, तर दिग्दर्शक ही होता .प्रहार मध्ये काम करण्यापूर्वी तुम्ही आर्मीत 3 वर्षे सेवा दिली म्हणूनच तुमचा अभिनयात कृत्रिमता नव्हती ,राष्ट्रीय पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार महाराष्ट्र पुरस्कार व भारत सरकारचा पदमश्री असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले. परंतु तुमचं व्यक्तिमत्व या पुरस्कारात बंदिस्त होण्याइतके थोटं नक्कीच नव्हतं, या पुरस्कारांना कृतकृत्य वाटावं अशी तुमची अभिनय क्षेत्रातली झेप! आगळे वेगळे व्यक्तिमत्व, रांगडा रोखठीक स्वभाव परंतु विलक्षण संवेदनाशील तुमचा स्वभाव परिस्थितीनेच घडलेला वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखाचे अप्रिय घटनाचे कडू घोट पचवल्यामुळेच तुमचा स्वभाव असा झाला झाला असेल आयुष्याने अनेकदा हादरवलं तुम्हाला पण तुम्ही पक्के त्या वेदनांनाची तुम्ही आपल्या कलेत ताकद बनवली, तुमचा पडद्यावरचा राग हा केवळ अभिनय नव्हता म्हणूनच वेलकम मधील उदय शेट्टी आम्ही विसरू शकत नाही फणसासारखा काटेरी पण आतून रसाळ होतात तुम्ही! गंभीर भूमिका ते विनोदी भूमिका दोन्हीत तुमच्या सहज सुंदर अभिनयाची साक्ष मिळते तुमचा तिरंगा कोण विसरणार? अभिनेता तसेच एक संवेदनाशील व्यक्ती म्हणून तुमची छबी रसिक हृदयात कायम असणार आहे,
आजकाल सामाजिक बांधिलकी हा शब्द स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतक्या वेळा सहज वापरला जातो या शब्दांची तुम्हाला कधी गरजच वाटली नाही ,ती अनुभवत होतो आम्ही ! शेतकऱ्यांचा आधारवड नाना,2015 मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळ पाणीटंचाई वशेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यामुळे तुमच्यातील माणूस जागा झाला मकरंद अनासपुरे व तुम्ही दोघे मिळून नाम फाउंडेशन ची मुहूर्तमेढ उभारली. सुरवातीला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मानसिक आधार देत तुमच्या कार्याची सुरवात झाली. पण हा कायमस्वरूपी उपाय नाही हे लक्षात आल्यावर या संकटाच्या मुळाशी असलेली पाणीटंचाई दूर करणे आवश्यक असल्याने तुम्ही जलसंधारण नदी नाल्याचे खोलीकरण, बंधारे कालवे दुरुस्ती व भूजल पातळी वाढविण्यावर भर दिला. शेतकरी कुटुंबातील विध्वंस आधार देणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे गावाचा विकास, रोजगारनिर्मिती व पूर दुष्काळ अशा मदतीचा हात देणे हे नाम चे वैशिष्ट्य ! फक्त मदत नाही तर शेतकरी ग्रामीण समाजाला स्वाभिमानाने उभे राहता येण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न कोण विसरणार? प्रसिद्धीच्या झोतात न राहता साधेपणाने गाजावाजा न करता तुम्ही गरिबांसाठी करत असलेले कार्य तुमच्या मोठेपणाचे अचूक उदाहरण आहे, नाना, खऱ्या अर्थाने तुम्ही महानायक आहात असं मीच नाही तुमचे सगळे चाहते नक्कीच म्हणत असणार!
नाना तुम्ही आम्हाला
सोडून कुठे कसे जाऊ शकणार? तुम्ही नेहमीच आमच्या बरोबर असणार आहात! तुमच्या संवादातून अभिनयातून आणि आठवणीतून! तुमची जागा कोण घेऊ शकणार ? आम्ही हेच म्हणणार नानात नाना पाटेकर नाना,
आणि दुःखाने मी नेहमी आठवणार ,का नाही तुमच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं माझं? का नाही?
जानेवाले कभी नही आते
हेच अंतिम सत्य
प्रतिभा पिटके
अमरावती
