*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मधुमिता लागू लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काळजी*
बाबा ,नगं रं तू जाऊ
मला एकलीला सोडून
तुझ्याइना करमंना
चल मला बी संग घिऊन..
दिस उगायच्या अगूदर
निंगतोस लपून छपून
आय बी जाती कामाला
मला येकटीला घरात ठिऊन..
खातंय कसंबसं दोन घास
तुमची याद करत करत
पन तुमाबिगर दिस माझा
बग ..न्हाई सरता सरत…
म्हायती हाय माज्यासाटी
तुमी ह्ये समदं करता
खूप शिकून म्होटी बनून
हापिसर बन म्हनता..
पन खरं सांगू बाबा तुला
मी खूप अभ्यास करीन
मोट्ठी होऊन बालिष्टर बनून
तुम्हांस्नी सुकात ठेवीन….
*मधुमिता लागू पुणे*
