नानिवडेत जलसंधारणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
बंधाऱ्यांची साफसफाई, प्लेट टाकून पाणी साठवणुकीची व्यवस्था; कच्चे वनराई बंधारे उभारले
नानिवडे
कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे जास्तीत जास्त संवर्धन व साठवणूक करण्यासाठी ग्रामपंचायत नानिवडेच्या वतीने जलसंधारणाचा उपक्रम राबविण्यात आला. गावातील बंधाऱ्यांची साफसफाई करून प्लेट टाकण्यात आल्या तसेच पाणी साठवणुकीची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच कच्चे वनराई बंधारेही बांधण्यात आले.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कामासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेत सहकार्य केले.
यावेळी सरपंच रेखा खाड्ये, सीआरपी रश्मी तांबे, कृषी सहाय्यक श्यामबाला, तलाठी अकिब इनामदार, ग्राम अधिकारी विक्रम वाळके, जलसुरक्षक तेजस खाड्ये तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
‘पाणी अडवा – पाणी जिरवा, गाव समृद्ध करा’ या संदेशातून ग्रामपंचायतीने जलसंधारणाबाबत जनजागृती केली आहे.
