नानिवडेच्या सरपंच रेखा खाडये यांची किसान मोर्चा जिल्हा चिटणीसपदी निवड
तीन वर्षांच्या कार्याची दखल; जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून बजावली होती जबाबदारी
वैभववाडी
नानिवडे गावच्या सरपंच श्रीमती रेखा खाडये यांची भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्या किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत त्यांनी संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर आता जिल्हा चिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल रेखा खाडये यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
