सुशीलकुमार रावराणे यांची भाजपा किसान मोर्चाच्या वैभववाडी मंडल अध्यक्षपदी निवड
कृषी क्षेत्रातील अनुभवाचा शेतकऱ्यांना होणार फायदा; प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
वैभववाडी : प्रतिनिधी :
भाजपा किसान मोर्चाच्या वैभववाडी मंडल अध्यक्षपदी सुशीलकुमार रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते रावराणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सुशीलकुमार रावराणे हे वैभवक्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक असून तालुका आत्मा (ATMA) समितीचे सदस्य आहेत. तसेच त्यांनी आचिर्णे गावचे माजी उपसरपंच म्हणूनही काम पाहिले आहे. प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी म्हणून त्यांचा कृषी क्षेत्राशी जवळचा संबंध आहे.
कृषी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव तसेच विविध पदांवर केलेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यांच्या नेतृत्वाचा वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी वर्गातून सुशीलकुमार रावराणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
येत्या आठवडा भरात पक्ष पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असलेली तालुका समिती जाहीर करणार असल्याचे सांगितले
