धाराशिव :
मराठवाड्याच्या वाट्याला येणारा नियतीचा दुष्काळ हा कायमस्वरूपी हटवण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना हव्यात असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी केले.
महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांच्या कार्यशाळेची आयोजन महाराष्ट्र लोकविकास मंच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या गुगल मीटमध्ये महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली,पुणे,बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा,अशा विविध जिल्ह्यातून स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.
जल हे जीवन आहे त्याचं संगोपन आणि योग्य वापर होण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात. कमी पाण्यात जास्त पीक घेणे आणि मराठवाडा दुष्काळ मुक्त करणे यासाठी सरकारने योग्य निर्णय घेऊन दुष्काळमुक्त मराठवाडा आणि महाराष्ट्र करावा या विषयावरती जागतिक लेवलवरचे पाणी तज्ञ विलास कुलकर्णी पुणे यांनी आपले विचार मांडले.
यानंतर कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त व्हावा पाण्याचं सू नियोजन व्हावं पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा पाणी मुरण्यासाठी आणि जतन करण्यासाठी व्हावा छोट्या छोट्या उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ द्यावं. शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजनेला जोडली जावीत. या विषयावरती माननीय विश्वनाथ अण्णा यांनी विचार मांडले. या सर्व विचार प्रवाहामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विशेषतज्ञानी यामध्ये सहभाग नोंदवला. सरकारने तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी मराठवाड्यातला दुष्काळ नव्हे तर महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र 2030 याची बांधणी करावी असा एकूणच सर्व स्वर स्वयंसेवी संस्थांचा निर्माण झाला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र लोकविकास मंच, उत्तरदायित्व NGO फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रस्तावना आणि आभार भूमिपुत्र वाघ यांनी केले.
