*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी लेखक विनायक जोशी लिखित अप्रतिम कथा*
*च चकव्याचा*
*मनुस्मृती* तीने कॅबचे दार उघडून ड्रायव्हरला सांगितले आणि डोळे मिटून निवांत पडून
राहिली. एक शार्प वळण घेऊन गाडी पोर्च मधे येऊन उभी राहिली. मीटर पाहून तिने पाचशेच्या दोन करकरीत नोटा ड्रायव्हरच्या हातावर ठेवल्या. परत आलेले चारशे रुपये आपल्या पर्समधे टाकून तिने लिफ्टचा दरवाजा उघडला. लीफ्टमन थोडा तंद्रीतच होता.
साब आज जल्दी आये है.
हे अस्पष्ट उद्गगार तिच्या कानावर पडले. परंतु त्या कडे दुर्लक्ष करून तिने लॅच उघडून घरात प्रवेश केला. डायनिंग टेबल वरील पसार्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून ती सरळ बाथरूम मध्ये शिरली. आत कुठलासा भयंकर दर्प पसरला होता. घाईघाईत तिने शाॅवर सुरू केला. मनसोक्त बाथ घेतल्यानंतर ती किचन मध्ये आली. फ्रिज मधील दूध काढून एका कपात ओतले. चमचाभर कोको पावडर तिने कपात टाकली आणि मायक्रोवेव्हमध्ये सरकवला. साईबाबांच्या फोटो समोर दोन मिनिटं उभी राहून तिने त्यांची करुणा भाकली.
मायक्रोवेव्हमधील कप बाहेर काढून शांतपणे तिने कोको संपवला आणि बेडरूमचे दार उघडून ती आत गेली.
नेहमीप्रमाणे अजय डोक्याला अमृतांजन लावून झोपला होता त्याचा वास सर्व बेडरूम मध्ये पसरला होता. तिने थोडा फ्रेशनर मारून तो वास सुसह्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आणि ती त्याच्या बाजूला डिस्टर्ब न करता
आडवी झाली.
कपाळावर आडवा हात करून डोळे उघडे ठेवून ती छताकडे पहात पडून राहिली. दिवसभरच्या थकव्यामुळे तिला कधी झोप लागली ते तिचे तिलाच कळले नाही.
किचन मध्ये पडलेल्या चिमट्याच्या आवाजाने तिला जाग आली. अजय हलकीशी सिटी वाजवून आपला चहा करून घेण्यात मग्न होता.
लाडात येऊन तिने त्याच्या पाठीवर हलकेसे थोपटले आणि ब्रश घेऊन ती बेसिन कडे पळाली. पटापट सर्व किचन आवरून तिने येणाऱ्या सखू करता बोर्डवर मेसेज लिहून ठेवला. आणि ती
अजयशी न बोलताच निघून गेली.
अजयनेही आपली सर्व आन्हीक उरकली आणि देवपूजा करून त्याने बाबांचे तस्बीरीला हार घातला.
थोडावेळ सेल फोनवर काही मेसेज आहेत का हे पाहून त्याने आपली ब्रिफकेस उचलली आणि दार बंद करून तो पोर्चमध्ये निघून गेला.
पोर्चमध्ये गाडी नाही हे पाहून त्याने आशाला फोन लावला. फोन एंगेज असल्यामुळे त्याने कॅब मागवून तो गेट कडे चालू वळला. दाराशी आलेली कॅब पकडून त्याने कॅब गेट वे ऑफ इंडियाला घ्यायला सांगितले.
कर्कचून लावलेल्या
ब्रेकचा आवाज ऐकून त्याने दार उघडून बाहेर पाहिले मात्र आणि त्याला एक प्रचंड धक्का बसला.
जांभळा ड्रेस परिधान केलेली एक महिला गाडीखाली आली होती.
त्याने वाकून पाहिले आणि नेमकी ती आशाच
असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याची शुद्ध हरपली. बाजूला बघ्यांची प्रचंड गर्दी झाली.
आशाच्या पर्समधील व्हिजिटिंग कार्डमुळे तीच्या जवळचे व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला त्यामुळे तिला बीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आल. सुदैवाने जीवावर आलेल पायावर निभावलं.
मात्र पोलिसांनी अजयच्या फोनवर संपर्क करून सुद्धा तो फक्त वाजत होता. मात्र उचलला जात नव्हता. शेजारील जनरल वॉर्ड मध्ये त्याला उपचार सुरू असताना त्याचा फोन खणाणला आणि आशाला झालेल्या एक्सीडेंटची बातमी त्याला सांगण्यात आली.
कर्मधर्म संयोगाने दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यामुळे त्याने आशाला पाहायची इच्छा प्रकट केली. त्याला आशाच्या रूममध्ये नेण्यात आले आणि तिच्या चीज वस्तू त्याच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या.
काही वेळातच आशाचा फोन वाजला म्हणून त्याने पाहिले तर *सुनील राघवन* याने तिच्या करता *प्यारे मोहन* हॉटेलमध्ये रूम नंबर 14 बुक करून ठेवल्याचे कळवले होते.
त्याने मेसेज पाहून फोन बंद करून ठेवून दिला.
अर्धा तास मध्ये गेला.
आशाच्या ऑफिसमधील मिसेस डिसूझा तिला भेटण्यासाठी मोठा पुष्पगुच्छ घेऊन घाईघाईत येताना दिसली. डिसोजा आत जाऊन आशाला भेटली आणि तिला तिने पुष्पगुच्छ दिला. काही मिनिटातच ती बाहेर गेली आणि अजय आशाच्या रूममध्ये गेला.
ती गेटवे ऑफ इंडियाला कशाकरता गेली होती याचा उलगडा झाला.
मिसेस डिसोजा आणि
सुनील राघवन हे दोघे एकाच वेळी आपल्या ऑफिसमधून बाहेर पडून एकाच टॅक्सीने हॉस्पिटल पर्यंत आले आणि मिसेस डिसुझा हॉस्पिटलमध्ये शिरल्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला होता. वाटेवर असणाऱ्या कोपऱ्यावरील फुल मर्चंट कडे क्षणभर थांबून त्यांनी पुष्पगुच्छ खरेदी केला होता. अर्थात तो कोणा करता घेतलाय याची चौकशी राघवनने
केली नव्हती. आणि त्याला आशाला अपघात झाल्याचे कळलेही नव्हते. त्या तिघांचे ऑफिस जरी एक होते तरी डिपार्टमेंट वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामांमध्ये मग्न असून कॉर्पोरेट शिस्तीच्या आधीन राहून कार्यरत असायचा.
अजय शुद्धीवर आल्यावर त्याने तीन पाळ्यांमध्ये तीन व्यावसायिक सेविका नेमून आपल्या दिवसभराच्या कामामध्ये काहीही व्यत्यय येऊन दिलेला नव्हता.
स्त्री वॉर्ड मधून
पुष्पगुच्छ घेऊन तो आपल्या मनु स्मृतीमध्ये येऊन तातडीचे मेसेज पाहून दिवसभर थकल्यामुळे झोपी गेला.
सकाळी दाराची बेल लवकर वाजल्यामुळे त्याने दार उघडून पाहिले, तर बाहेर सखू उभी होती. तिने बाईसाहेबांना अपघात झाल्याचे अजयला सांगितले आणि त्यासाठी ती आज लवकर येऊन त्याचा डबा करून देणार होती.
आपली सर्व काम आवरून तो आंघोळीला गेला,आणि फोनवर राघवन चा फोन आला.
त्याने अशाबद्दल चौकशी करून त्यांच्या पाहुण्यांकरिता 14 नंबर रूम हॉटेल प्यारे मोहन
मधे बुक करून ठेवली असल्याचे सांगितले.
राघवन आशाकडे अधून मधून येत असल्यामुळे सखू त्याला ओळखत होती.
अजय अंघोळ करून आला आणि त्याने देवपूजा करून आपले बाबांचे फोटो समोर उदबत्ती लावून हात जोडले.
पाच मिनिटं देवाचे ध्यान करून त्याने डबा आणि ब्रिफकेस घेतली आणि तो आपल्या ऑफिस कडे निघाला. गेटातून बाहेर पडय होता
त्याक्षणी त्याला आपली कार दारात येऊन उभी राहिल्याचे लक्षात आले. ड्रायव्हर खाली उतरून त्याने चाव्या अजयच्या हातात देऊन राघवन साहेबांनी आपणास धन्यवाद सांगितले आहेत असा निरोप दिला.
आशाचा गेटवे ऑफ इंडियाला झालेल्या अपघाताची लिंक अजयच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
याचा अर्थ अपघात होण्यापूर्वी आशाआणि राघवन आपल्याच गाडीने फिरून गेटवे ऑफ इंडियाला भेटत होते ही शंका खरी ठरली.
दिवसभराचे काम उरकून अजय सायंकाळी सहा वाजता व्हिजिटिंग अवर्स मध्ये हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याने आशाची भेट घेतली. आणि गाडी मिळाल्याचे व राघवनने चावी पाठवल्याचे तिच्या ध्यानात आणून दिले.
अपघाताच्या या धक्क्यामध्ये ती हे पार विसरून गेली होती.पण बदललेल्या चेहऱ्याचे रंग अजयच्या लक्षात यायचे राहिले नाहीत. त्याने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. रादर त्याकडे दुर्लक्ष करून विषय बदलून तो तिच्याशी बोलत राहिला.
आशाची भेट घेऊन अजय आपल्या घरी आला. शेजारी असलेल्या शॉप मध्ये त्याने सकाळ करता टोस्ट बिस्किटे खरेदी केली. त्यावेळी शॉप किपरने त्याच्या हातात एक पार्सल दिले, आणि सांगितले की हे हॉटेल प्यारे मोहन च्या सेवकाने आपलं घर बंद होतं म्हणून येथे चौकशी केली. आपली गेली 25 वर्षाची ओळख असल्यामुळे त्याने हे पार्सल काही एक शंका न घेता माझ्याकडे ठेवून तो निघून गेला. धन्यवाद देऊन अजयने ते पार्सल ताब्यात घेतले आणि तो घरी आला.
दिवसभरच्या थकलव्यामुळे त्याला जेवणाची इच्छा नव्हती.
त्याने पोळीचे दोन तुकडे खाल्ले आणि आन्नाला नमस्कार करून सर्व झाकून ठेवले.
फोनवर आलेले मेसेजेस पाहून त्याने ते पार्सल उघडले. आत मध्ये गेल्या वर्षी साजरा झालेल्या लग्नाच्या वाढदिवसाची साडी त्या पार्सलमध्ये असल्याचे त्याच्या लक्षात आले.आणि त्याचे डोळे चमकले.
दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिसला जायच्या ऐवजी तडक प्यारे मोहन हॉटेल गाठलेले आणि पार्सल देऊन गेलेल्या सेवकाची भेट घेतली. सुखा सुखी त्याला त्या सेवकाला भेटता आले नाही त्यामुळे त्याने त्या सेवकास बक्षीशी द्यायची आहे असे सांगून त्याला बोलवायला सांगितले.
आणि त्याला बक्षीस घेऊन तो निघून गेला. दिवसभर आपलं काम उरकून हॉटेलचा सेवक बाहेर पडण्यापूर्वी तो हॉटेल बाहेर जाऊन उभा राहिला आणि त्याने त्या सेवकाची भेट घेतली. आतापर्यंत आशा कोणत्या कोणत्या दिवशी या हॉटेलमध्ये येत होती याच व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याने त्या सेवकाचे हात ओले करून मिळवलं आणि
तो घरी परतला.
आता सर्व प्रकरण त्याला कळून चुकलं होतं. हातात संपूर्ण पुरावे होते.
सहा आठवडे उलटून गेल्यानंतर आशाच्या पायाचे प्लास्टर काढण्यात आलं आणि तिला बायंडेज बांधून घरी सोडण्यात आलं.
मधे महिना उलटला आणि एक दिवस वकील
घरी येऊन धडकला.
अजयने आपले सर्व म्हणणे आशाला पोस्ट करून टाकले होते.
आता फक्त कोणताही आरडाओरडा किंवा त्रागा न करता तिने शहाण्या माणसासारखे निघून जाणे एवढाच पर्याय शिल्लक होता.
वकील आणि पाठोपाठ अजय ही घरी आला.
आणि गोष्टी स्पष्ट करून सांगून सह्या करण्याची विनंती केली.
एवढ्यात एक नकाशे नावाचे गृहस्थ येऊन उपस्थित झाले आणि त्यांनी सांगितले की आशा मॅडम आपल्या नाटकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. त्याचा बक्षीस समारंभ 26 जानेवारीला ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आला आहे. हे निमंत्रण स्वीकारून 26 तारखेला अजय साहेबांसह उपस्थित राहावे ही विनंती.
अजय नकाशेना घेऊन आपल्या बेडरूममध्ये गेला आणि नकाशे यांनी तेथे घडत असलेल्या रंगीत तालमीबद्दल सर्व सविस्तरपणे सांगून या नाटकाची बक्षिसापर्यंत झालेली वाटचाल अजय पुढे सादर केली.
आता सर्व मळभ दूर झाले होते. वकिलांची फी त्यांना देऊन त्याना निरोप देण्यात आला.
अजयने आशाचे रूम मध्ये जाऊन तिथे हात हातात घेऊन तिची क्षमा मागून मनापासून दिलगिरी व्यक्त केली. अजयला अंधारात ठेवून या सर्व गोष्टी झाल्यामुळे
गैरसमजाचे वादळ अजयच्या डोक्यावर घोंगावत होते.ते क्षणात दूर झाल्यामुळे आनंदाचा पाऊस पडू लागला. आणि आशा अजयच्या संसाराचे तारू येणाऱ्या भयंकर वादळापासून सही सलामत बाहेर पडले. अर्थात दोघांनी एकमेकांना मिठी मारून एकमेकांची क्षमा मागितली.
विनायक जठाणे🖋️ठाणे
0310/9324324157
