You are currently viewing शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती…

शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती…

शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती…*

शाहूनगर :

शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक भरत गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर बोडके, गोपाळ सैंधाणे हे उपस्थित होते.

वाचनालयाचे उपाध्यक्ष व्याख्याते राजेंद्र घावटे, विश्वस्त मनीषा पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती सांगितली.

खजिनदार राजेंद्र पगारे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल अनिता पाटील, सहग्रंथपाल तेजश्री घेवारी, सहाय्यक रवींद्र अडसूळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गणेश सहाणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा