सावंतवाडीत ‘अंगण का उत्सव’; अंगणवाडी सेविकांचा सन्मान
सुधाताई कामत शाळा क्रमांक २ मध्ये अनुराधा पवार व अमिषा सासोलकर यांचा गौरव; विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप
सावंतवाडी
सुधाताई कामत शाळा क्रमांक २, सावंतवाडी येथे ‘अंगण का उत्सव’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांचा सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर आणि कार्यक्रम संयोजिका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका दिपाली भालेकर यांनी केले. यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर तसेच भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, मिसबा शेख, मेघना साळगावकर, मीना दाभोलकर, मेघना भोगटे, साक्षी गवस, तृप्ती विरनोडकर, ज्योती मुद्राळे, रूपाली रेमुळकर, शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक अंजीवडेकर सर, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार अनुराधा पवार यांनी मानले.
